सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

बाप्परे, जवळपास १० हजार खोटी मतदान ओळखपत्र सापडली

बंगळूरमधील राजा राजेश्रेवरी मतदार संघातील अपार्टमेंटमध्ये जवळपास १० हजार मतदान ओळखपत्र सापडली आहेत. आता यावरुन भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत.एका फ्लॅटमधून दोन ट्रंक भरुन मतदान ओळखपत्र सापडल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यांनी या ओळखपत्राचा रंग निवडणूक आयोग देत असलेल्या ओळखपत्रापेक्षा वेगळा असल्याचे सांगितले. त्यामुळे ही ओळखपत्र खोटी असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. 
 
दरम्यान, या प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ट्विट करुन हा लोकशाहीवर घाला असल्याचे सांगितले त्यांनी यामागे काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना नायडू यांचा हात असल्याचा आरोप केला. भाजपने ही अपार्टमेंट काँग्रेसच्या खासदाराशी संबधीत आहे असा आरोप करत राजा राजेश्वरी नगर मतदारसंघातील मतदार संघातील निवडणूक रद्द करण्याची मागणी केली. याबाबत कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी संजिव कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले  आहेत.