सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

आता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. शनिवारपासून परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. हुकुमशहा किंग जोंग उन यांनी घेतलेला हा मोठा निर्णय म्हणजे जगासाठी गुड न्युज आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 
 
उत्तर कोरियाचे हुकुमशहा यांनी फक्त अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणस्त्रांचे परीक्षण थांबवण्याचाच निर्णय घेतलेला नाही तर त्याचे केंद्रीही बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. नॉर्थ कोरियाने जाहीर केलेला हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची भेट मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र या भेटीआधीच किम जोंग उन यांनी दोन पावले मागे येत आण्विक परीक्षण बंद करण्याची घोषणा केली आहे. दक्षिण कोरियाचे आर्थिक स्थिती बिकट आहे त्यातून सावरण्यासाठी किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.