गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (13:38 IST)

कोट्याधीश साईबाबा, 11 दिवसांत 17 कोटींचे दान

वर्षाच्या शेवटी सुट्टीच्या काळात शिरडीत भक्तांची गर्दी उमटली होती. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाची सुरुवात या निमित्ताने भाविकांनी शिरडीत दर्शन घेतले. येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गेल्या 11 दिवसांत बाबांच्या झोळीत तब्बल 16 कोटी 93 लाख रुपयांचे दान टाकले आहे. 
 
मागीलवर्षीच्या तुलनेत यामध्ये 2 कोटी 88 लाखांची भर पडली असून आता पर्यंतची ही विक्रमी देणगी आहे. साईबाबा संस्थानद्वारे दिलेल्या माहितीनुसार 23 डिसेंबर 2019 ते 2 जानेवारी 2020 या काळात भक्तांनी दिलेली भेट आणि जमा झालेली देणगी यांचा हिशोब करण्यात आला. या दरम्यान शिरडीत 8 लाख 23 हजारांहून अधिक भाविकांनी भेट दिली. बायोमेट्रीक दर्शन व्यवस्था तसेच सशुल्क पासेस याद्वारे दर्शन घेतलेल्या भाविकांची नेमकी नोंद होते. 
 
या काळात दानपेटीत 9 कोटी 54 लाख, देणगी काऊंटरवर 3 कोटी 46 लाख, ऑनलाइन पद्धतीने 73 लाख, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे 1 कोटी 38 लाख, चेकद्वारे 1 कोटी 50 लाख, विदेशी मुद्रा 24 लाख, सोनं 1 किलो 213 ग्राम (42 लाख), चांदी 17 किलो (24 लाख) अशी देणगी जमा झाली आहे.