21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तानचे वीर्य लाखो रुपयांना विकले जात होते
काही महिन्यांपूर्व चांगलीच चर्चा रंगली होती ती म्हणजे पंजाबमधील एका रेड्याची. हा महागडा रेडा पशुमेळाव्यात सर्वांचे लक्ष वेधत अससे. हरियाणातील कैथल येथील सुल्तानसाठी आफ्रिकन शेतकऱ्याने 21 कोटी रुपयांची बोली लावली होती, पण त्याचा मालक नरेश याने तो विकला नाही. परंतु 14 वर्षीय सुल्तान झोटेचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे मालक नरेश बेनीवाल यांच्या घरात शोककळा पसरली आहे.
नरेशने सुल्तानची खूप काळजी घेत होते आणि त्याला कुटुंबाचा एक भाग मानत होते. अहवालानुसार, सुल्तान वार्षिक सुमारे एक कोटी रुपये कमवून देत असे.
सुल्तानच्या र्वीयाला होती मोठी मागणी
सुल्तानचे वीर्य देशभरात लाखो रुपयांना विकले जात होते. सुल्तानच्या वीर्याला रेड्यांच्या मुर्रा जातीला मोठी मागणी होती.सुल्तान हजारो वीर्याचे डोस देत होता जे प्रति डोस 300 रुपयांना विकले जायचे. त्यामुळे सुल्तानची वेगळीच ओळख होती. सुल्तानच्या माध्यमातून त्याचा मालक वर्षाला अंदाजे 90 लाख रुपये कमवायचा.
2013 मध्ये झज्जर, कर्नाल आणि हिसार येथे झालेल्या राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धेत सुल्तान राष्ट्रीय विजेता ठरला होता. एका प्रदर्शनामध्ये सु्ल्तानसाठी 21 कोटी रुपयांची बोली लागली होती मात्र मालकाने लाडक्या सुल्तानला विकण्यास नकार दिला.
सुलतान हा मुर्रा जातीचा सर्वांत उंच 6 फुटापेक्षा उंच रेडा होता. त्याचे वजन 1700 किलो होते.एकदा बसल्यावर तो सुमारे 7 ते 8 तास बसून राहायचा. तो दररोज 3000 रुपये किमतीचा चारा खात होता. त्याला दररोज 10 किलो धान्य आणि दूध दिले जात होते. सफरचंद आणि गाजर खायचा. त्याचे लाड राजशी थाटात व्हायचे. बेनीवाल म्हणाले की त्यांच्या कडे या जातीच्या 25 पेक्षा जास्त म्हशी आहे.