सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Updated : शनिवार, 27 जुलै 2019 (09:03 IST)

सरकार आल्यावर खासगी, शासकीय नोकरीत स्थानिकांना ७५ टक्के जागा कायदा करणार -अजित पवार

आमचे सरकार आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांना ७५ टक्के जागा राखीव ठेवणार. सत्तेत आल्यानंतर याबाबतचा कायदा करणार. अजित पवार यांनी सोलापुरात  घोषणा केली. कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे. वंचितमुळे बारा जागावर फटका बसला आहे. दोघांनाही फटका बसला. विरोधकांनी समंजसपणा दाखवणे गरजेचे आहे. भाीरतीय जनता पक्षात जात असलेल्या लोकांबध्दल बोलताना ते म्हणाले काही लोक चौकशी सुरुय, काहींना कारखान्यासाठी कर्ज हवेत, काहींच्या पतसंस्थावर गुन्हे दाखल आहेत. अशा अनेक गोष्टींमुळे अनेकजण भाजप सेनेत गेले. आपले वय वाढलेय, लोकसभेचा निकाल काय लागला हे पाहून पक्षांतर करतात. हसन मुश्रीफ यांना भारतीय पक्षाच्या एका बड्या नेत्याने ऑफर दिली होती. ता त्यांनी स्पष्ट शब्दात नाकारीली, पण ते गेले नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्यावर कारवाई केली असा आरोप अजित पवार यांनी सोलापूर येथे केला आहे.
 
या युतीच्या सरकारमधील काही मंत्र्यांचे पंख छाटले गेलेत. आगामी विधानसभेसाठी आम्ही काहीही करुन १७५ जागा निवडून आणायच्याच आहेत याचा प्रयत्न सुरुय. ३० वर्षाचा अनुभव पणाला लावून आम्ही विधानसभा लढवणार. पीक विम्याबाबत मोर्चे कसले काढताय? कर्जमाफी केली तर आम्ही कौतुक करु. कर्जमाफी हे नवे गाजर दाखवलेय. निवडणुका जिंकण्यासाठी या घोषणा सुरुय. विधानसभेत पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उभारणार नाहीत. अनेक लोक पक्षांतर करत आहेत आमच्याही पक्षाचे काही लोक गेले. कोणीही गेले तरी पक्ष चालत राहतो, काही प्रमाणात फटका बसतो मात्र ती जागा भरुन काढली जाते. प्रलोभन दाखवून माणसे फोडण्याचे काम सुरुय असे अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.