गांधी जयंतीच्या मुहूर्तावर नारायण राणे भाजपात
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे दोन ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे आहे. आमदार चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये दोन ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता राणेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असून, त्यात ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपामध्ये विलीन करणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या पक्षाने केंद्रातील एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर राणेंना भाजपने राज्यसभेवर खासदार केले होते. राणे भाजपामध्ये येण्यासाठी इच्छुक होते. मात्र, राणेंना भाजपामध्ये घेण्यासाठी शिवसेनेने विरोध केल्यामुळे राणेंचा भाजपा प्रवेश रखडला होता. राणेंना थेट भाजपा प्रवेश न मिळाल्यामुळे राणेंनी पक्ष स्थापन केला. राणेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण होणार आहे.