महात्मा गांधी: साबरमती कारागृहातल्या बंदीजनांसाठी गांधी आजही जिवंत

Last Modified शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (16:53 IST)
अहमदाबाद येथील साबरमती आश्रमापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी मंदिर आहे.साबरमती कारागृहातली ही विशेष कोठडी उत्सुकता जागवते.

साबरमतीच्या मध्यवर्ती कारागृहात महात्मा गांधींनी 10 दिवस कारवास भोगला होता. त्यांना 11 मार्च 1922 ला अटक झाली होती.

या कारागृहातील 10 बाय 10 फूटांच्या या कोठडीत गांधींना ठेवण्यातं आलं होतं.
भारतात त्यांना झालेली ही पहिली अटक होती.

"या कोठडीनजीक सकारात्मक भावनांचा अनुभव येतो, या कोठडीनजीक गांधींच अस्तित्व जाणवतं," असं मत इथल्या बंदीजनांच आहे.
या कोठडीचं नामकरण 'गांधी खोली' असं करण्यातं आलं आहे. बंदीजन इथं दररोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करतात.
या कारागृहात जन्मठेप भोगलेले नरेंद्रसिंह म्हणतात, "गांधी यार्ड हा असा परिसर आहे, जिथं मी चित्रं काढण्यासाठी जात होतो."
ते म्हणाले, "या ठिकाणी मी सकारात्मक चेतनांचा अनुभव घेतला आहे."

बंदीजनांची आवडती जागा
शिक्षा भोगून झाल्यानंतर नरेंद्रसिंह नवं आयुष्य जगत आहेत.
ते म्हणतात, "गांधी शरीरानं आपल्यात नसले, तरी इथल्या बंदीजनांसाठी मनानं मात्र ते इथंच आहेत."

साबरमती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक आणि आय. पी. एस. अधिकारी प्रेमवीरसिंग यांनी या मंदिरासंदर्भात प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, "गांधी खोलीनजीक असताना काहीतरी वेगळं अनुभवता येतं. म्हणूनच कारगृहातील बंदीजनांना इथ वेळ घालवावा असं वाटतं."या कारगृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले जयराम देसाई गांधींची तुलना परमेश्वराशी करतात.
ते म्हणाले, "परमेश्वर मंदिरात असतो की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण या ठिकाणी गांधी एकेकाळी राहिले आहेत."ते म्हणतात, "मला त्यांच अस्तित्व आजही जाणवतं, म्हणून मी दररोज इथं दिवा लावतो आणि नमस्कार करतो. मला इथं बरं वाटतो."
अनेक वर्षांची परंपरा
विभाकर भट्ट साबारमती मध्यवर्ती कारागृहात गेली 33 वर्ष संगीत शिक्षक म्हणून काम करतात.

ते म्हणाले, "या कोठडीत केव्हापासून दिवाबत्ती करतात, याची कल्पना नाही."
"पण जेव्हापासून मी इथं आहे, तेव्हापासून या खोलीत दिवाबत्ती केली जात असल्याचं मी पाहतो."

साबरमती मध्यवर्ती कारागृहात सरदार वल्लभाई पटेल यांनाही स्वातंत्र्य लढ्यात अटक झाल्यानंतर या कारगृहात ठेवण्यातं आलं होतं.या कारागृहात गांधी खोलीच्या बाजुलाच 'सरदार यार्ड' आहे.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

खासदार नवनीत राणा यांना "...मारण्यासाठी", धमकी; दिल्लीत ...

खासदार नवनीत राणा यांना
खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या वैयक्तिक फोनवरून सतत अपमानाच्या आणि जीवे मारण्याच्या ...

सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय हा वैध व्यवसाय मानला, ...

सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय हा वैध व्यवसाय मानला, आदेश - पोलिसांनी त्रास देऊ नये
नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आदेश ...

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वार्षिक दिनाच्या ...

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वार्षिक दिनाच्या समारंभात पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे रोजी येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB)च्या 20 व्या वार्षिक ...

मेंढीने केली महिलेची निर्घृण हत्या

मेंढीने केली महिलेची  निर्घृण हत्या
अनेक वेळा अशा बातम्या येतात की वाचक नुसते बघत राहतो आणि हे कसे घडले याचे आश्चर्य वाटते. ...

तुमचे SBI मध्ये पगार खाते असल्यास, तुम्हाला 35 लाख ...

तुमचे SBI मध्ये पगार खाते असल्यास, तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, या आहेत अटी
जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक SBIचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू ...