गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

संक्रातीला काळे कपडे घालण्यामागील कारण

भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला गेला आहे मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण ज्या ऋतुमध्ये त्यानुसार परंपरा वेगवेगळ्या असतात. ऐरवी पूजेत काळा रंग निष्द्दि मानला जातो परंतू संक्रातीत काळ्या रंगाचं खूप महत्तव असल्याचे दिसून येतं. या पूजेत बायका बिनधास्त काळ्या रंगाची साडी नेसून मिरवताना दिसतात. 
 
जानेवारीतीतल पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होणे याला संक्रांत असं म्हटतात. मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणून देखील संबोधलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून तिळ तिळ दिवस वाढू लागतो म्हणजे दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप देण्याची परंपरा आहे.
 
वैज्ञानिक कारण बघायला गेलो तर ज्या प्रकारे पांढरा रंग किंवा हलके रंग जसा उष्णता परावर्तित करतात अर्थात उष्णता शोषून घेत नाही त्याप्रकारे काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत सण हिवाळ्यात येत असल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रात म्हणून हलव्याचे दागिने घालून सण थाटात साजरा केला जातो. आणि काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने देखील उठून दिसतात म्हणून काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे.