1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified मंगळवार, 12 जानेवारी 2021 (10:18 IST)

मकर संक्रांतीचे विविध रूप, 6 मनोरंजक गोष्टी

हिंदू महिन्यानुसार, पौष शुक्ल पक्षात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर सूर्य उत्तरायण होतो. उत्तरायण म्हणजे त्या काळापासून पृथ्वीचे उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळते आणि सूर्य उत्तरेकडून निघू लागतो. ह्याला सोम्यायन देखील म्हणतात. 6 महिने सूर्य उत्तरायण असतो आणि 6 महिने दक्षिणायन असतो. म्हणून हा पर्व 'उत्तरायण चा नावाने ओळखला जातो. मकर संक्रांती पासून कर्क संक्रांती च्या मधल्या 6 महिन्याच्या काळाला उत्तरायण म्हणतात. हा सण संपूर्ण भारतातच नव्हे तर इतर देशात देखील विविध रूपात साजरा होतो. 
 
या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते आणि हा सण अखंड भारतात पिकांच्या आगमनाच्या आनंदात साजरा केला जातो. खरीप पीक कापले जाते आणि रब्बी पिके शेतात बहरले जातात. शेतात मोहरीची फुले सुंदर दिसतात. मकर संक्रांतीच्या या पर्वाला भारताच्या वेगवेगळ्या राज्यात स्थानिक पद्धतीने साजरा करतात.
 
1 पोंगल - दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा सण पोंगलच्या रूपात साजरा करतात. हा सण गोवर्धन पूजा, दिवाळी आणि मकरसंक्रांतीचे मिश्रित रूप आहे. पोंगल विशेषतः शेतकरी बांधवांचा सण आहे. हा सण सुमारे 4 दिवस चालतो. हा सण पौष महिन्याच्या प्रतिपदेला साजरा करतात. पोंगल म्हणजे खिचडीचा सण. पोंगलच्या आधी अमावास्येला लोक वाईट प्रथा सोडून चांगल्या गोष्टींना ग्रहण करण्याची प्रतिज्ञा घेतात. ह्या कार्याला पोही म्हणतात. ज्याचा अर्थ आहे 'जाणारी'. पोंगलचा अर्थ उफान किंवा विप्लव असत. पोहीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला दिवाळी प्रमाणे पोंगलचा धुमाकूळ सुरू असतो.
 
2 लोहरी - पंजाब, हरियाणा आणि त्यांच्या प्रभावी क्षेत्रात ह्याला लोहरी म्हणतात. लोहरी वसंताच्या आगमनाच्या सह 13 जानेवारी, पौष महिन्याच्या शेवटच्या रात्री साजरी करतात. याच्या पुढच्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते जी पौष महिन्यात येते. वैशाखी सणा प्रमाणेच लोहरीचा संबंध देखील पंजाबच्या खेड्यात, पीक आणि हवामानाशी आहे. लोहरीच्या संध्याकाळी लोक लाकूड पेटवून त्या अग्नीच्या भोवती फेऱ्या मारून नाचतात, गातात आणि अग्नीत रेवड्या, भुईमुगाच्या शेंगा, लाह्या, पॉप कॉर्न अर्पण करतात. अग्नीभोवती प्रदक्षिणा घालून लोक शेक घेतात आणि रेवड्या, लाह्या, तीळ गूळ, कणीस खाण्याचा आनंद घेतात.
 
3 बिहू - बिहू सण आसाम मध्ये पीक कापणी चा सण आहे. पीक कापणी होते म्हणून हा सण साजरा होतो. या सणाला पूर्वोत्तर क्षेत्रात विविध नावाने साजरा केला जातो. वर्षात तीनदा हा सण साजरा केला जातो. प्रथम हा सण हिवाळ्याच्या हंगामात पौष संक्रांतीच्या दिवशी, दुसऱ्यांदा विषुव संक्रांतीच्या दिवशी आणि तिसऱ्यांदा कार्तिक महिन्यात साजरा करतात. पौष महिन्यातील संक्रांतीला भोगाली बिहू, विषुव संक्रांतीला रोंगाली बिहू आणि कार्तिक महिन्यात कोंगाली बिहू साजरा केला जातो.
 
4 चहार-शंबे सूरी - इराण मध्ये देखील नवीन वर्षाचा सण अशाच प्रकारे साजरा करतात. हा सण देखील लोहरीने प्रेरित आहे. ह्या सणात देखील अग्नी पेटवून मेवे अर्पण करतात. उदाहरणार्थ -पंजाब, हरियाणा आणि दिल्ली मध्ये साजरी केली जाणारी लोहरी आणि इराणचा चहार -शंबे सूरी हे एकसारखे सण आहे. ह्या सणाला इराणी पारशी किंवा प्राचीन इराण चा सण मानतात. हा सण नवरोज च्या एक दिवसापूर्वी साजरा करतात. 
नवरोज किंवा नौरोज, इराणी नवीन वर्षाचे नाव आहे, ह्याला पारशी धर्माचे लोक साजरा करतात, इराणचे शिया देखील या सणाला साजरे करतात ह्या मागील कारण म्हणजे हा सण त्यांच्या प्राचीन संस्कृतीचा मुख्य सण आहे. मुळात हा सण निसर्ग प्रेमाचा सण आहे. प्राचीन परंपरा आणि संस्कारासह नवरोज चा सण केवळ इराणातच नव्हे तर इतर शेजारच्या देशात साजरा करतात. पश्चिम आशिया, काकेशस, काळा सागर बेसिन आणि बाल्कन मध्ये ह्याला 3000 हून अधिक वर्षांपासून साजरा केला जातो. हा सण इराणी दिनदर्शिकेच्या पहिल्या महिन्याच्या(फॉरवर्दीनं )चा पहिला दिवस आहे.
 
5 पंतंगोत्सव -गुजरातसह अनेक राज्यात हा सण पतंगोत्सव म्हणून देखील ओळखला जातो. पतंग उडविण्यामागील मुख्य कारण म्हणजे काही काळ सूर्याच्या प्रकाशात घालवणे आहे. हा काळ हिवाळ्याचा आहे आणि या काळात सकाळी सूर्याचा प्रकाश शरीरासाठी आरोग्यदायी तसेच त्वचे आणि हाडांसाठी फायदेशीर ठरतो. म्हणून या सणांसह आरोग्यालाही फायदा होतो.
 
6 संक्रांती उत्सव - कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशात ह्याला संक्रांती म्हणून म्हणतात. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे, तिळगूळ खाणे आणि सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व आहे. हा दिवस दान आणि उपासने साठी महत्त्वाचा आहे. या दिवसापासून सर्व रोग आणि दुःख नाहीसे होतात. वातावरणातील कोरडेपणा कमी होतो. या दिवशी उडीद, तांदूळ, तीळ, चिवडा, गाय, सोनं, उबदार कपडे, ब्लॅंकेट इत्यादी दान करण्याचे महत्त्व आहे. महाराष्ट्रात देखील ह्याला संक्रांती म्हणतात. या दिवशी महाराष्ट्रात स्त्रिया सवाष्णींना तीळ, गूळ हळद-कुंकू देतात. 
 
या शिवाय गुजरात आणि उत्तराखंडात ह्याला उत्तरायण सण म्हणतात. हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबात ह्याला माघी पण म्हणतात. उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये ह्याला खिचडी उत्सव म्हणतात. 
भारतातही उपमहाद्वीपच्या इतर देशांमध्ये जसं की बांगलादेश मध्ये पौष संक्रांती, नेपाळ मध्ये माघे संक्रांती किंवा खिचडी संक्रांती, थायलंड मध्ये ह्याला सोंगकारण, लाओस मध्ये पिमालाओ, म्यांमार मध्ये थींयांन, कंबोडिया मध्ये मोहा संगक्रान आणि श्रीलंकेत पोंगल आणि उझवर तिरूनल म्हणतात.