सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (16:01 IST)

दोन तोंडी केसांपासून मुक्तीसाठी हे उपाय अवलंबवा

सुंदर केस केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात असे नाही तर केसांच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण देखील असतात.  आजकाल बहुतेक लोक केस गळणे किंवा दोन तोंडी केसांमुळे खूप चिंतित आहेत. त्यामुळे अनेक महिलांना केस कापून लहान करावे लागतात. केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की अनियमित आहार आणि प्रदूषण. जर आपण देखील अशा प्रकारच्या समस्येने त्रस्त असाल तर हे सोपे उपाय फॉलो करा.
स्प्लिट एंड्स,म्हणजे दोन तोंडी केस खूप कोरडे असताना होतात. यामुळे केसांचा वरचा संरक्षक थर केसांच्या टोकापासून वेगळा होतो आणि नंतर दोन भागांमध्ये विभागला जातो. केस दोन तोंडी होण्याचे अनेक कारणे असू शकतात. त्यात वायर ब्रश किंवा वायर रोलर्स वापरणे, केस सुकविण्यासाठी किंवा स्टाईल करण्यासाठी हिट एप्लिकेशनवापरणे आणि केसांना परत बॅक कोम्बिंग करणे समाविष्ट आहे. 
 
दोन तोंडी किंवा स्प्लिट एंड्स होण्यापासून रोखनासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे वेळोवेळी त्यांना खालून ट्रिम करणे. पण जर आपल्याला केस ट्रिम न करता स्प्लिट एन्ड्स टाळायचे असतील तर या टिप्स फॉलो करा.
 
1 गरम टॉवेल वापरा- 
हा उपाय करण्यासाठी आठवड्यातून दोनदा खोबरेल तेल गरम करून केसांना आणि मुळांना लावा. यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवून पिळून घ्या. आता हा गरम टॉवेल डोक्याला15 मिनिटे गुंडाळा. डोक्याला गरम टॉवेल कमीतकमी 3 ते 4 वेळा गुंडाळा. हे केस आणि टाळूतील तेल चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते, त्यामुळे स्प्लिट एंड स्वतःच दुरुस्त होते.
 
2 सौम्य हर्बल शैम्पू वापरा- स्प्लिट एंड्स टाळण्यासाठी सौम्य हर्बल शैम्पू वापरा . या उपायाने  केसांना चांगले पोषण तर मिळेलच शिवाय केसांना स्प्लिट एंड्सपासूनही सुटका मिळेल. शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर किंवा हेअर सीरम लावा. 
 
हे घरगुती उपाय फॉलो करा -  
अंड्यातील पिवळ बलक - केसांना पोषण देण्यासाठी आणि त्यांना दोन तोंडी होण्यापासून  रोखण्यासाठी, अंड्यातील पिवळ बलक केसांवर मास्क म्हणून लावा. यासाठी अंड्यातील पिवळ बलकमध्ये ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल मिसळून केसांना लावा. लिंबाच्या रसासोबत अंड्यातील पिवळ बलक देखील केसांवर वापरता येते.
 
पपई-हा उपाय करण्यासाठी पिकलेल्या पपईच्या गरमध्ये 3 मोठे चमचे दही टाकून टाळूला लावा. ही पेस्ट केसांवर आणि मुळांवर लावा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा. 
 
होममेड हेअर कंडिशनर- होममेड हेअर कंडिशनर बनवण्यासाठी अर्धा कप दुधात एक टेबलस्पून क्रीम चांगले मिसळा.आणि नंतर केसांना लावावे लागेल. 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.