सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: शनिवार, 23 मे 2020 (18:37 IST)

पाळीव पशू-पक्ष्‍यांचे जीवनात महत्त्व

- प्रमोद त्रिवेदी 'पुष्प' 

आपल्या घरात आहे का पाळीव प्राणी- पक्षी? जाणून घ्या हे आपले आयुष्य कसे वाचवतात
 
घरात कुठल्याही पाळीव प्राणी पाळण्याआधी बहुदा ज्योतिष किंवा वास्तुशास्त्रांचा सल्ला घेतला जातो. प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये नकारात्मक आणि अनिष्ट घटकांवर नियंत्रण ठेवण्याची अफाट क्षमता असते. या पाळीव प्राण्यांमध्ये या विश्वात अस्तित्वात असलेल्या नकारात्मक शक्तींना सुप्त करण्याची क्षमता असते. 
 
आजच्या आधुनिक युगात देखील बहुतेक लोकं एखाद्या प्राण्याच्या रंगाशी शुभ आणि अशुभ फळ जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
 
1 कुत्रा हा मानवाचा विश्वासू मित्र आहे. हा देखील नकारात्मक शक्तींना कमी करू शकतो. 
त्यातही काळा कुत्रा सर्वात जास्त उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रख्यात ज्योतिषी जय प्रकाश धागेवाले म्हणतात की अपत्ये होत नसल्यास काळा कुत्रा पाळावा. त्याने संतान प्राप्ती होते. तसं तर काळा रंग अनेकांना नावडता असतो. तरीही हा शुभ आहे.
 
2 तसेच काळ्या कावळ्याला जेवण दिल्याने शत्रू आणि अनिष्टाचे नायनाट होतं. तथापि कावळा फार भित्रा असतो आणि माणसाला घाबरतो. कावळा एकाच डोळ्याने बघू शकतो.
 
3 शुक्राचे देव देखील एकांक्षी आहे. शनी देव देखील एकांक्षी आहेत. शनीला प्रसन्न करायचे असेल तर कावळ्यांना जेवू घालावे. घराच्या पाळीवर कावळा ओरडत असल्यास घरात पाहुणे नक्की येतात.
 
4 पण असेही म्हटले आहे की कावळा जर घराच्या उत्तर दिशेने बोलत असल्यास घरात लक्ष्मी येते. पश्चिमेकडून बोलल्यावर पाहुणे येतात. पूर्वीकडून बोलल्यावर शुभ बातमी मिळते. आणि दक्षिणेकडून बोलल्यावर काही वाईट बातमी ऐकायला मिळते.
 
5 आपल्या शास्त्रात गायीच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. जसे की शुक्राची तुलना एका सुंदर स्त्रीशी केली आहे. ह्याला गायीशी देखील जोडले गेले आहे. म्हणून शुक्राचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गोदान केलं जातं. ज्या जमिनीच्या भागेवर घर बांधायचे आहे, त्या ठिकाणी 15 दिवस गाय आणि वासरू बांधल्याने ते स्थळ पवित्र होतं. तसेच त्या भागात असलेल्या दानवी शक्तींचा नायनाट होतो. 
 
6 पोपटाचा हिरवा रंग बुध ग्रहाशी निगडित असतो. म्हणून घरात पोपट पाळल्याने बुधाच्या वाईट दृष्टीचे प्रभाव दूर होतील. घोडा पाळणे देखील शुभ असतं सर्व जण तर घोडा पाळू शकत नाही. तर ते आपल्या घरात काळ्या रंगाच्या घोड्याची नाळ ठेवून शनीच्या रागापासून वाचू शकतात.
 
7 गुरुवारी हत्तीला केळे खाऊ घातल्याने राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव दूर होतात. 
 
8  मासे पाळल्याने आणि त्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घातल्याने बरेच दोष दूर होतात. यासाठी सात प्रकाराचे धान्याचे पिठाचा पिंड तयार करा आपल्या वयाच्या बरोबरीने त्या पिंडाला आपल्या शरीरावरून ओवाळून घ्या. नंतर आपल्या वयाच्या संख्यांप्रमाणे गोळ्या बनवून मासांना खाऊ घाला. 
 
9  वास्तुशास्त्री आपल्या घरात फिश पॉट ठेवण्याचा सल्ला देतात. जे समृद्धी आणि सुख वाढवतं. मासे आपल्या मालकावरील येणारे संकट आपल्यावर ओढून घेतात.
 
10 कबुतरांना शंकर आणि पार्वतीचे रूप मानले आहे. पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कबुतर अशुभ मानला गेला आहे.
 
11 जगातील बहुतांश भागात मांजर दिसणे अशुभ मानतात. काळी मांजर तर अंधाराचे प्रतीक असल्याचे म्हणतात. 
 
12 वैशिष्ट्य गोष्ट अशी आहे की ब्रिटनमध्ये काळी मांजर शुभ मानली जाते. शेवटी कुत्र्यांच्या संदर्भात एक अजून गोष्ट अशी की कुत्रा पाळण्याने घरात लक्ष्मी येते आणि कुत्रा घरातील आजारी असलेल्या सदस्यांचे आजार आपल्यावर घेऊन घेतो.