रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (13:33 IST)

सोशल मीडियावर Viral Post : मळलेल्या कणकेवर बोटांचे ठसे का?

अलीकडे एक पोस्ट व्हायरल होत आहे की महिला कणीक मळल्यावर त्यावर बोटांचे ठसे का सोडते? या पोस्टंच कोणतेही वैज्ञानिक आधार नाही परंतू सामान्य लोक हे मान्य करायला तयार आहे... जाणून घेऊया काय आहे पोस्ट-
 
आपण लक्ष देऊन बघितले असेल की स्त्रिया जेव्हाही कणीक मळतात त्या शेवटी त्यावर आपल्या बोटांचे ठसे सोडतात किंवा अनेक महिला आपल्या हातात चिकटलेलं ओल्या पिठाचा गोळा त्यावर चिकटवून देतात. 
 
खरं तर यामागे कुठलंही वैज्ञानिक कारण नाही परंतू एक प्राचीन मान्यता आहे. हिंदू धर्मात पूर्वज आणि मृत आत्म्यांची संतुष्टीसाठी पिंड दान विधी सांगितली गेली आहे. 
 
पिंडदानासाठी जेव्हा कणिकेचा गोळा(पिंड) तयार करतात तेव्हा त्याचा आकार अगदी गोल असतो. अर्थात या प्रकारे मळलेलं पीठ पूर्वजांसाठी असतं. मान्यता आहे की या प्रकारे कणकेचे गोळे बघून पूर्वज कोणत्याही रूपात येतात आणि ते ग्रहण करतात. 
 
हेच कारण आहे की जेव्हा मनुष्यांसाठी कणीक मळली जाते तेव्हा त्याचा आकार गोल नसून त्यावर बोटांचे ठसे सोडले जातात. हे ठसे दर्शवतात की हे पीठ पूर्वजांसाठी नसून मनुष्यांसाठी आहे. 
 
प्राचीन काळात स्त्रियां दररोज एक लाटी पूर्वजांसाठी, दुसरी गायीसाठी आणि शेवटली कुत्र्यासाठी काढत होत्या. आमच्या घरातील वयस्कर महिलांशी यासंबंधी चर्चा केल्यावर 
 
कळून आले की कणकेतून एक लहानशी लाटी पुन्हा त्यावर लावण्याचा अर्थ आहे की अन्नदेवतांचे स्मरण करून जीवधार्‍याच्या निमित्ताने घरातील अन्न अर्पण करणे तसेच नंतर बोटांचे ठसे सोडल्यावर गाय, कुत्रा, मुंग्या, चिमण्या इतरांसाठी त्यांचा वाटा काढणे...
 
पिंड किंवा पितृ संबंधित गोष्टीवर त्या सहमत नव्हत्या....