पेट्रोलच्या दरात १.३४ आणि डिझेलमध्ये २.३७ रुपयांची वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यात पेट्रोल प्रतिलिटर १.३४ रुपये आणि डिझेलच्या प्रतिलिटर २.३७ रुपयांची वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. याआधी ऑक्टोंबर महिन्यात तेल कंपन्यांनी दोनवेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही सरकारने नियंत्रण मुक्त केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील किंमतीचा आढावा घेऊन सतत हे दर जास्त-कमी होत असतात. दुसरीकडे डिझेल दरवाढीचा परिणाम महागाईच्या दरावर होत असतो. त्यामुळे डिझेल महागल्याचा काही प्रमाणात महागाईवर परिणाम होणार आहेत.