मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 25 मार्च 2020 (18:07 IST)

CoronaVirus: Big Bazaar देणार होम डिलिव्हरी

जगभरात करोना व्हायरसच्या फटका बसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरातच दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी अखेर संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली.
 
या घोषणेनंतर जनतेची किराणा माल आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी झुंबड उडाली. तरी पुढील 21 दिवस जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील असे स्पष्ट केले गेले आहेत. या दरम्यानच बिग बझार व्यवस्थापन यांनी लॉकडाउन कालावधीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ग्राहकांसाठी बिग बझार लॉकडाउन काळात घरपोच अन्नधान्य व इतर गरजेच्या सामनाची डिलिव्हरी करणार आहे.
 
यासाठी केवळ जवळच्या बिग बझार दुकानात फोन करुन सामानाची यादी द्यावी लागेल तसेच घरी सामान आल्यावर पैसे चुकवावे अशा आशयाचे ट्विट बिग बझारकडून करण्यात आले आहे. तसेच, विभागनिहाय त्या भागातील दुरध्वनी क्रमांकदेखील देण्यात आले आहेत.