रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (10:08 IST)

बीएसएनएलकडून बुक माय फायबर लाँच

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने लोकांपर्यंत सहजपणे इंटरनेट पोहोचवण्यासाठी कंपनीने नवीन पोर्टल ‘BookMyFiber’ लाँच केले आहे. या पोर्टलच्या मदतीने युजर्स नवीन फायबर कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे हे पोर्टल देशभरातील सर्व बीएसएनएल टेलिकॉम सर्कलमध्ये लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे याचा मदतीने युजर्स सहजपणे इंटरनेट सेवा मिळवू शकतील.
 
‘BookMyFiber’चा वापर करून नवीन फायबर कनेक्शन घेऊ इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला http://bookmyfiber.bsnl.co.in/ या वेबसाईटवरून जाऊन डिटेल्स द्यावे लागतील. ज्यामध्ये पत्ता, सर्किल म्हणजे तुमचं राज्य, पिन कोड, नाव मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी याविषयी माहिती द्यावी लागेल. याचा इंटरफेस अगदी सोपा असून याचा वापर करताना युजर्सना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. हे पोर्टल ओपन करताचा तुम्हाला नकाशा दिसले आणि डाव्याबाजूला एक बॉक्स दिसले तिथे तुम्हाला डिटेल्स भरायच्या आहेत.
 
बीएसएनएलच्या BookMyFiber पोर्टलवर आपली डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही आवश्यकतेनुसार सुविधा आणि फायबर प्लॅन निवडू शकता. फायबर प्लॅनची सुरुवातीची किंमत ४९९ रुपये आहे आणि यामध्ये युजर्सना अनलिमिटेड डाटासह अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली आहे. याशिवाय ४२९ रुपये, ७७७ रुपये, ८४९ रुपयेपासून २ हजार ४९९ पर्यंतचे प्लॅन आहेत.