सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 18 जून 2022 (15:16 IST)

Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

petrol diesel
Petrol Diesel Price Today :भारतीय तेल कंपन्यांनी 21 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.  इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज 18 जून रोजी स्थिर ठेवल्या आहेत.देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे. तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर इतका आहे. 
 
तर चेन्नईत एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.  
 
एसएमएसद्वारे दररोज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आधारावर, तेल विपणन कंपन्या किमतींचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित करतात.इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.  
 
21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी  केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.