मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (09:15 IST)

सोन्याचे भाव ५६ हजाराच्या पुढे गेले

जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील सोन्या-चांदीच्या दराची तेजी कायम असून एमसीएक्स वायदे बाजारात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने 56 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचे प्रती 10 ग्रॅमचे दर शुक्रवारी सकाळी 300 रुपयांनी वाढून 56 हजार 143 रुपयांवर गेले. चांदीचे प्रतिकिलोचे दरही 1750 रुपयांनी वाढून 77 हजार 802 रुपयांवर गेले आहेत. 
 
सोन्याच्या दरात गुरुवारी 720 रुपयांनी वाढ झाली होती, त्यापाठोपाठ सोने परत 300 रुपयांनी वाढले आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर चालूवर्षी तब्बल 44 टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक बाजारातही सोने दराचा दररोज नवा विक्रम होत आहे. 
 
जागतिक बाजारपेठेत सोन्याचे प्रती औंसचे दर 2070 डॉलर्सच्या आसपास स्थिर झाले आहेत. दुसरीकडे चांदीचे प्रती औंसचे दर 30 डॉलर्सवर गेले आहेत. अन्य चलनाच्या तुलनेत डॉलर कमजोर होत असल्याने देखील सोन्या-चांदीला मागणी आली आहे. जागतिक बाजारात चालू वर्षी सोन्याचे दर 35 टक्क्याने वाढले आहेत.