शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (17:42 IST)

उद्या परवा बँका बंद असणार

28-29 मार्चला भारत बंद राहणार केंद्रीय कामगार संघटनांच्या मंचाने 28 मार्च आणि 29 मार्च रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. 
 
मोदी सरकारच्या धोरणांविरोधात भारत बंद पुकारण्यात येत असून त्याचा फटका कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे. या संपात बँकिंग क्षेत्रही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बँकिंग आणि विम्यासह आर्थिक क्षेत्र देखील या संपाला पाठिंबा देत आहेत.
 
SBI म्हणते की संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात. तथापि, त्याच्या शाखा आणि कार्यालयांमध्ये सामान्य कामकाज सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. काही ऑपरेशन्स प्रभावित होऊ शकतात.
 
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा निर्णय आणि बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक-2021 च्या निषेधार्थ हा संप केला जात आहे.