गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 14 एप्रिल 2018 (09:45 IST)

म्हणून कोटक महिंद्रा बँकेने कर्मचा-याची केली हकालपट्टी

सोशल मीडियावर कठुआ बलात्काराचं समर्थन करत पीडित मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या कर्मचा-याची कोटक महिंद्रा बँकेकडून खराब कामगिरी केल्याबद्दल हकालपट्टी करण्यात आली आहे. विष्णू नंदकुमार असं या कर्मचा-याचं नाव असून ज्यादिवशी त्याने ही वादग्रस्त पोस्ट केली, त्याचदिवशी त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं.
 

‘अशा दुर्देवी घटनेनंतर एखाद्याने मग तो माजी कर्मचारी का असेना, पण अशा प्रकारचं वक्तव्य करणं खूपचं निराशाजनक आहे. आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो’, असं बँकेचे प्रवक्ता रोहित राव यांनी सांगितलं आहे. ‘आम्ही विष्णू नंदकुमार याला खराब कामगिरीसाठी ११ एप्रिल २०१८ रोजी कामावरुन काढून काढून टाकलं आहे’, अशी माहितीही त्यांनी दिली.

‘उद्या भारताविरोधात मानवी बॉम्ब होण्यापेक्षा तिची हत्या झाली हे चांगलं’, असं विष्णू नंदकुमारने पोस्टमध्ये लिहिलं होतं. मल्याळम भाषेत ही पोस्ट करण्यात आली होती. विष्णू नंदकुमारच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड मोठा वाद निर्माण झाला होता. युजर्सनी विष्णू नंदकुमारविरोधात कारवाई करण्याची मागणी धरुन लावली होती.