मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (08:41 IST)

जयंत पाटील यांनी एसटी चालवल्यावरून नवा वाद

jayant patil
माजी मंत्री जयंत पाटील यांचा एसटी चालवतानाचा एक व्हीडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
 
पण याच व्हीडिओमुळे जयंत पाटील यांच्याबाबत नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
 
कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या सांगलीतील इस्लामपूर आगाराची बस चालवली, असं म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे.
 
यासंदर्भात भाजपने इस्लामपूर पोलिसात तक्रारही दिल्याची माहिती समोर आली आहे.
 
एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना जड वाहनचालक म्हणून आवश्यक असणारा परवाना बॅच बिल्ला नसताना जयंत पाटील यांनी जड वाहन बेकायदेशीररित्या चालवलं, असा आरोप भाजपच्या इस्लामपूर येथील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
 
केवळ जयंत पाटील नव्हे तर आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनीही एसटी बस चालवल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
 
त्याबाबत भाजपकडून तक्रार दाखल झाली किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही.