बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

परवडणा-या घरप्रकल्पांसाठी जीएसटी नाही

सर्वसामान्यांना परवडणारी घरं बांधण्यात येत असल्यामुळे या घरांची विक्री करताना त्यावर जीएसटी आकारू नका, असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने सर्व बांधकाम व्यावसायिकांना दिलेत.

सध्या परवडणा-या घरप्रकल्पांसाठी आठ टक्के जीएसटी आकारण्यात येतोय.  हा कर बांधकाम व्यावसायिकांना इनपुट क्रेडिटच्या बदल्यात वळता करून घेतला जाईल, असं आश्वासनही सरकारनं दिल आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना या घरांची विक्री करताना जीएसटी लावता येईलही. मात्र या घरांचा निर्मिती खर्च दाखवून त्यावर क्रेडिटचा दावा केला असेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष घराची विक्री किंमत कमी केली असेल, तरच तो आकारता येणार आहे.