सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (20:12 IST)

Petrol Diesel Price: आज तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या नवे दर

आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.
 
कोलकात्यात पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.