बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (10:16 IST)

पेट्रोलच्या किंमतीत आग, आता डिझेल 100 रुपयांच्या जवळपास

एका दिवसाच दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोलने यापूर्वीच अनेक शहरांमध्ये 100 रुपये ओलांडले आहेत आणि डिझेलची किंमत 100 रुपयांपेक्षा 20 पैसे इतकीच दूर आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी उच्च आहेत. त्याचवेळी राजस्थानमधील श्रीगंगानगर पेट्रोल 106 च्या पलीकडे आहे. 
 
पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 29 पैसे तर डिझेलमध्ये 28 पैशांची वाढ झाली आहे. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 95.85 रुपयांवर गेले. तर डिझेलही 86.75 रुपये प्रति लिटरवर पोचला. 23 दिवसांत 5.53 पेट्रोल महाग झाले आहे. तर डिझेल 5.97 रुपयांनी महागला आहे.
 
आज देशातील बड्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल कोणत्या दराने विकले जात आहेत ते पहा ...
शहराचे नाव पेट्रोल रुपये/ लिटर डिझेल रुपये / लिटर
श्रीगंगानगर 106.94 99.8
अनूपपुर 106.59 97.74
रीवा 106.23 97.41
परभणी 103.14 93.78
इंदौर 104.08 95.44
जयपुर 102.44 95.67
दिल्ली 95.85 86.75
मुंबई 101.04 94.15
चेन्नई 97.19 91.42
कोलकाता 95.8 89.6
भोपाल 104.01 95.35
रांची 92.08 91.58
बेंगलुरु 99.05 91.97
पटना 97.95 92.05
चंडीगढ़ 92.19 86.4