पुलवामामध्ये शहीद जवानांच्या कुटुंबीयांना रिलायंस फाउंडेशनची मदत
जम्मू-काश्मिरात पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. यानंतर देशातील प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने मदतीचा हात देत आहे. या दरम्यान रिलायंस फाउंडेशन देखील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदत करणार आहे.
रिलायंस फाउंडेशन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शिक्षा, नोकरी आणि उपचार हेतू मदत करणार. प्रत्येकाच्या परिस्थतीप्रमाणे मदत दिली जाईल. फाउंडेशनद्वारे राज्य सरकारांसह मिळून ही मदत करण्यात येईल. तसेच शहिदांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी फाउंडेशनच्या सर्वोत्तम रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध केली जाईल.
या प्रकारेच शहीद जवानांच्या मुलांचे शिक्षण, स्कॉलरशिप देणे याची व्यवस्था देखील फाउंडेशनतर्फे केली जाईल. तसेच कुटुंबीयांना नोकरीसाठी मदत हवी असल्यास फाउंडेशन साथ देईल. हे पूर्ण क्रियाकलाप राज्य सरकारबरोबर करण्यात येतील. उल्लेखनीय आहे की नीता अंबानी रिलायंस फाउंडेशनची चेयरपर्सन आहे.