सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (22:11 IST)

सॅमसंगकडून प्री-बूकिंग ऑफर

सॅमसंगने लॉकडाउन संपल्यानंतर ज्यांना टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन किंवा अन्य उपकरण खरेदी करायचे असेल अशा ग्राहकांसाठी कंपनीने प्री-बूकिंग ऑफर आणली आहे. सॅमसंग कंपनी Stay Home, Stay Happy या ऑफरअंतर्गत आपल्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर कॅशबॅक देत आहे.
 
“गेल्या महिन्याभरात हजारो ग्राहकांनी टीव्ही किंवा अन्य उपकरणे कसे खरेदी करता येतील याबाबत विचारणा केली. आम्ही ग्राहकांना नेहमी सर्वोच्च प्राधान्य देतो. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी ही प्री-बूकिंगची ऑफर आणली आहे. लॉकडाउन शिथील झाल्यानंतर ग्राहकांना त्यांनी बूक केलेल्या प्रोडक्टची होम डिलिव्हरी दिली जाईल”, असे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन म्हणाले. 
 
8 मे पर्यंत सॅमसंगचे कोणतेही उपकरण बूक करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीची ही ऑफर आहे. युजर सॅमसंगच्या ऑनलाइन इ-शॉपमधून (https://www.samsung.com/in/offer/online/ce-sale/) प्रोडक्ट्स प्री-बूक करु शकतात. बूक केलेल्या कोणत्याही प्रोडक्टवर ग्राहकांना 15 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. पण, ही ऑफर केवळ एचडीएफसीच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरच आहे. मात्र, याव्यतिरिक्तही कंपनीच्या अनेक ऑफर आहेत. प्रोडक्ट्सच्या खरेदीवर ग्राहकांच्या सोयीसाठी नो-कॉस्ट इएमआय, 18 महिन्यांपर्यंत लॉन्ग टर्म फायनान्सचा पर्यायही ठेवला आहे.