पुढील आठवड्यात या चार दिवस बँक बंद आहे
मार्च महिना हा सणांनी भरलेला असतो, त्यामुळे जर तुमचा बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर बँकेत जाण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्या तपासून घ्या. पुढील आठवड्यात सलग ४ दिवस बँकेत कोणतेही काम होणार नाही. होळीमुळे बँकांना सुट्टी असेल. कोणत्या दिवशी कोणत्या शहरातील बँका बंद राहतील चला जाणून घ्या.
बँकिंग सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केली आहे. RBI वर्षाच्या सुरुवातीला बँकिंग सुट्ट्यांची यादी जारीकरते. यामध्ये राज्यानुसार सुट्ट्यांचा समावेश आहे.
मार्च महिन्यात बँकेला एकूण 13 दिवस सुट्या होत्या .ज्यामध्ये 4 रविवारचाही समावेश आहे. याशिवाय सुट्ट्यांची यादी राज्यनिहाय आहे.
कोणत्या शहरात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील ते पाहूया
* 17 मार्च - (होलिका दहन) - डेहराडून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमधील बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
* 18 मार्च - (होळी / धुलेती / डोल जत्रा) - बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता बँका बंद राहतील.
* 19 मार्च - (होळी / याओसांगचा दुसरा दिवस) - भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथील बँका बंद राहतील.
* 20 मार्च - रविवार (साप्ताहिक सुट्टी) मुळे सर्व शहरातील बँका बंद राहतील.