बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 30 जानेवारी 2022 (14:12 IST)

या बँकांचे नियम 1 फेब्रुवारी पासून बदलणार आहेत, जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा यांच्या ग्राहकांसाठी बँकेशी संबंधित आवश्यक नियम बदलतील. बँक खातेधारकांसाठी 1 फेब्रुवारी 2022 पासून बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. याबाबत बँकेने खातेदारांना वेळोवेळी माहिती दिली आहे. खातेदारांनी महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) या सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी फेब्रुवारी 2022 पासून नियम बदलतील.
 
चेक क्लिअरन्स नियम बदलेलणार - बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी 1 फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलतील. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी आता ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टमचा नियम पाळावा लागणार आहे. धनादेश दिल्यानंतर खातेदारांना धनादेशाशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागेल. बँकेकडून धनादेशाची पुष्टी करणे अनिवार्य असेल. कोणतीही पुष्टी नसल्यास, धनादेश देखील परत केला जाऊ शकतो.
 
1 फेब्रुवारीपासून SBI खातेधारकांसाठी नियम बदलतील 1 फेब्रुवारीपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांसाठी अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. SBI ग्राहकांना 1 फेब्रुवारीपासून पैसे ट्रान्सफर करणे कठीण होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून SBI ग्राहकांना IMPS व्यवहारांवर अधिक शुल्क आकारले जाईल. आपण बँकेत जाऊन IMPS द्वारे निधी हस्तांतरित केल्यास, आपल्या कडून 2 लाख ते 5 लाख रुपयांसाठी 20 रुपये अधिक GST आकारला जाईल. नवीन नियम 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहे.
 
पंजाब नॅशनल बँकेने पुढील महिन्यापासून डेबिट खात्याशी संबंधित नियम बदलले आहेत. पुढील महिन्यापासून नियमात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. PNB नुसार, 1 फेब्रुवारीपासून हप्ता किंवा गुंतवणूकीच्या डेबिट खात्यात पैसे नसल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यास, आपल्याला 250 रुपये द्यावे लागतील. सध्या यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता ती वाढवून 250 रुपये करण्यात आले आहे. तर, डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यावर 150 रुपये भरावे लागतील.