गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (10:17 IST)

वाहन खरेदी वाढली, आरटीओच्या तिजोरीत मोठा महसूल जमा

मुंबीत अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने ताडदेव आरटीओ कार्यलायत २९१, अंधेरी आरटीओमध्ये २१५ आणि वडाळा आरटीओमध्ये २७८ वाहनांची नोंदणी झाली आहेत. या वाहन नोंदणीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल गोळा झाला आहे. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी तिन्ही आरटीओमध्ये ७८४ वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यलयात झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहनांच्या खरेदी वाढ झाली आहे. वाहन नोंदणीतून अंधेरी आरटीओमधून १ कोटी ५५ लाख ७१ हजाराचा महसूल सरकारच्या तिजोरीत गोळा झाला आहे. तर ताडदेव आरटीओकडून ७८ लाख ५४ हजाराचा महसूल सरकारच्या तिजोरीत गोळा झाला आहे.