गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (15:39 IST)

किराणा दुकानात मिळणार आता वाईन

आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अपण किराणा दुकानात जातो तर आता राज्यात आता किराणा दुकान, बेकरीमध्ये जर वाईन विकण्यासाठी ठेवली असल्याचे दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण आता राज्य सरकार वाईनची विक्री किराणा दुकानामध्ये विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेणार आहे. तसेच १ लीटरमागे १० रुपये अबकारी कर आकारण्यात येणार असल्यामुळे वाईन खरेदी करणाऱ्यांचे खिसे देखील गरम होणार आहेत. किराणा दुकान आणि बेकरीमध्ये वाईनची विक्री केल्यावर राज्यात किती खपत होते याबाबतची माहिती मिळणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरतही ५ कोटी रुपयांचा निधी कर वाढवल्यामळे जमा होणार असल्यामुळे वाईनबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
 
राज्य सरकारकडून मंगळवारी वाईनवरील नॉमिनल एक्साईज ड्युटी (अबकारी कर) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईनवर १० रुपयांचा कर आकारण्यात आला आहे. राज्यातील किराणा दुकान, बेकरीमध्ये वाईन विकण्याच्या परवानगीविषयी लवकरच राज्य सरकार नोटीस जारी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण तुलनेने कमी असते. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात बेकरीमध्ये आणि हॉटेलमध्ये पदार्थ बनवण्यासाठी वाईनचा वापर करण्यात येतो.
 
द्राक्ष शेतकरी बाजार आणि देशांतर्गत वाइन निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाइनवर कोणताही कर नाही, तर त्यापूर्वी कर खूपच कमी होता. नवीन कर लागू केल्याने राज्याला केवळ 5 कोटी रुपयांचा महसूल मिळणार असला तरी, उत्पादन शुल्क प्रशासनाला बाजारात विकल्या जाणार्‍या वाईनच्या बाटल्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे मुख्य उत्पादक शुल्क सचिव वल्सा नायर सिंह यांनी म्हटजले आहे.  
 
महाराष्ट्रात सध्या ७० लाख लिटर वाईनची वर्षाला खपत होते, वर्षाला १ कोटी लीटर खपत होण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बारमध्ये वाईन सीलबंद असलेल्या बॉटलमधूनच विकता येणार आहे. दोन बारमधील अंतर २०० मीटर असावं हा नियम लागू होणा नाही. बीअरसारखेच बारमध्ये वाईन कॅनमध्ये देण्यात येऊ शकतात. अलिकेडच राज्यात आयात करण्यात आलेल्या व्हिस्कीवर ३०० टक्के लीटरवरुन १५० टक्के कर कमी करण्यात आला आहे. तसेच लवकरच वाईनबाबत राज्य सरकार आदेश जारी करण्याची शक्यता आहे.