शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (13:21 IST)

खाद्यतेलांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली,डाळींनी देखील स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले

सध्या कोरोनामुळे सामान्य माणसाचे हालच होत आहे,लॉकडाऊन मुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहे.त्यातून वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची कंबरच मोडली आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर बाजारातील खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या होत्या.परंतु साथीच्या दुसऱ्या टप्प्यात किमती जास्त वाढल्या आहे.याचा बाजारावर परिणाम होत आहे.
 
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य माणसाच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा बिघडले आहे.फक्त गेल्या एका महिन्यात खाद्यतेलांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.तर डाळींच्या किमतीत सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात डाळींचे भाव नव्या उंचीवर आहेत.
 
रिफाइंड तेलाच्या किमतीत गेल्या महिन्याच्या तुलनेत 5 रुपयांनी वाढ झाली आहे, तर मोहरीच्या तेलाच्या किंमतीत 20 रुपयांनी वाढ झाली आहे.दिल्ली ग्रेन मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणतात की,खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेला कारणीभूत आहे.गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांच्या किमती वाढल्याने दिल्लीतील खाद्यतेलांच्या थोकच्या किमतीत 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.
 
दिल्लीच्या किरकोळ बाजाराबद्दल बोलायचे झाले तर 20 जुलै रोजी मोहरीचे तेल 145 रुपये लिटर होते, तर 20 ऑगस्टला ते 165 रुपये प्रति लीटरवर पोहोचले. रिफाइंड तेल 150 रुपयांवरून 155 रुपये लिटरवर गेले. 

डाळीचे भाव देखील कडाक्याने वाढले आहे.तूरडाळ 100 ते 110 रुपये झाली, मसूर डाळ 85 ते 90 रुपयांवर पोहोचली.उडीद डाळ देखील 5 रुपयांनी वाढून 95 वरून 100 पर्यंत पोहोचली.चणा डाळ देखील 70 वरून 75 पर्यंत वाढली