बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:40 IST)

BSNLचा Work from Home प्लान! दररोज 5GB डेटा मिळेल

bsnl offer
कोरोना व्हायरसमुळे  2 वर्षांपूर्वी सुरू झालेले वर्क फ्रॉम होम, (Work From Home), Omicron मुळे अजूनही घरातून काम सुरू आहे. वर्क फ्रॉम होम डेटा प्लॅन, जसे नावच सूचित करते की, ही योजना अशा लोकांसाठी आहे जे घरून ऑफिसचे काम करत आहेत. BSNL ने हा प्लॅन २ वर्षांपूर्वी लॉन्च केला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता कंपनीने पुन्हा हा प्लान आपल्या ग्राहकांसाठी सादर केला आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला या धनसू योजनेबद्दल सविस्तर सांगतो.
 
BSNL चे वर्क फ्रॉम होम STV 599 योजना: कंपनीचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) अमर्यादित कॉलसह राष्ट्रीय रोमिंग ऑफर करते, ज्यात दिल्ली आणि मुंबईच्या MTNL रोमिंग क्षेत्रांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा मिळतो, ज्यामध्ये दररोज 5GB डेटा मिळतो, एकदा तुम्ही दिवसभरात 5GB डेटा वापरल्यानंतर तुमचा स्पीड 80 Kbps होईल. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये, MTNL नेटवर्कसह कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 विनामूल्य एसएमएस प्रदान करते.
 
या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. तुम्ही हे स्पेशल टॅरिफ व्हाउचर CTOPUP, BSNL वेबसाइट किंवा सेल्फ-केअर अ‍ॅक्टिव्हेशनद्वारे सक्रिय करू शकता.
 
BSNL चा वर्क फ्रॉम होम प्लॅन रु. 251
BSNL आणखी एक वर्क फ्रॉम होम प्लॅन ऑफर करते, ज्याची किंमत रु. 251 आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 70GB डेटा मिळतो. हा प्लॅन फक्त डेटा स्पेसिफिक आहे आणि जर तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला कॉलिंग स्वतंत्रपणे रिचार्ज करावे लागेल. या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे.
 
BSNL कडून 151 रुपयांचा आणखी एक वर्क फ्रॉम होम प्लॅन
BSNL त्यांच्या ग्राहकांना आणखी एक वर्क फ्रॉम होम प्लॅन देते, ज्याची किंमत रु. 151 आहे. यामध्ये तुम्हाला 40GB डेटा मिळत आहे, आणि या प्लानची वैधता देखील 30 दिवसांची आहे.