शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (15:35 IST)

अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न - नाना पाटेकर

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी गोडसेची भूमिका करणं म्हणजे गोडसेच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं आहे का? असा सवाल केला. तसेच अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं मत व्यक्त केलं. विशेष म्हणजे मीही नथुराम गोडसेची भूमिका केली होती, असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलं. ते एका वृत्तावाहिनीशी बोलत होते.
 
‘अमोल कोल्हे केवळ नथुराम गोडसेची भूमिका करत आहे. ते नटही आहेत आणि राजकारणातही आहेत. त्यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर इतका वाद होण्याची गरज नाही. ‘लास्ट व्हॉईस राय – माऊंटबॅटन’ या चित्रपटात मीही नथुराम गोडसेचं काम केलं आहे, पण अनेकांना माहिती नाहीये’, असं पाटेकर म्हणाले.