बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (13:00 IST)

पावनखिंड सिनेमा 31 डिसेंबरला रिलीज होणार

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' सिनेमाचं येत्या 31 डिसेंबरला रोजी रिलीज होणार आहे. कोविड संकटामुळे लांबणीवर पडलेला हा सिनेमा स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा सांगणार आहे.
 
ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. 
 
‘पावनखिंडीचा’ थरार दर्शविणारे चित्रपटाचे पोस्टरही नुकतच प्रदर्शित झाले आहे.