गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 9 मार्च 2021 (14:37 IST)

इंग्लंडचे सर्व खेळाडू यंदा आयपीएलचा पूर्ण हंगाम खेळणार

आयपीएलच्या आगामी हंगामात विविध संघांकडूनखेळणारे इंग्लंडचे सर्व 13 खेळाडू यंदाची संपूर्ण स्पर्धा आपापल्या संघांकडून खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. परंपरागतयारीत इंग्लंडचे खेळाडू मे महिन्यातील पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात देशांतर्गत मालिकांमध्ये सहभागी होण्यासाठी आयपीएल मध्येच सोडून प्रयाण करत असत. यंदा इंग्लंड बोर्डाने आपल्या खेळाडूंना संपूर्ण स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली आहे.
 
यामुळे न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीत त्यांचे अनेक खेळाडू सहभागी होऊ शकणार नाहीत. आयपीएलचा महागडा खेळाडू असूनही बेन स्टोक्सने कधीही आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळला नाही. 2017 मध्ये तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी स्वदेशी परतला होता. यामुळे रायझिंग पुणे सुपरजायंटला प्ले ऑफमध्ये त्याची कमतरता भासली होती. पुढील वर्षी स्टोक्सने पाकिस्तानविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी आयपीएलचे प्ले ऑफचे सामने सोडले होते. 2019 मध्येही त्याने विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंडला परतणे पसंत केले होते. यंदा मात्र स्टोक्ससोबत असे घडणार नाही.