शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (13:57 IST)

मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करून नवा विक्रम रचला

दोन दशकांहून अधिक काळ भारतीय महिला क्रिकेटची प्रमुख म्हणून काम करणारी मिताली राज शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारी भारताची पहिली आणि जगातील पहिली दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
 
38 वर्षीय मितलीने वनडे क्रिकेटमध्ये 50.53च्या सरासरीने 6,947 धावा केल्या आहेत. याशिवाय मितालीने टी-20मध्ये 2,364 आणि कसोटीत 663 धावा केल्या आहेत. मितालीने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत 75 अर्धशतके आणि आठ शतकेही केली आहे. 
 
इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्स ही मितालीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा मिळवणारी एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. एडवर्ड्सने वयाच्या 41व्या वर्षी मे 2016मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तिने 191 एकदिवसीय सामन्यात 5,992 धावा आणि 95 टी-20 सामन्यांमध्ये 2,605 धावा आणि 23 कसोटी सामन्यात 676 धावा केल्या आहेत. 
 
लखनौच्या एकाना स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या वनडे सामन्यात मितालीने 35वा धावा पूर्ण केल्या असता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता तिच्या नावावर 10,001 धावा आहेत आणि तिची  सरासरी 46.73 आहे.