शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (19:25 IST)

सुरेश रैनाचे तडकाफडकी हिंदुस्थान येण्याचे कारण समजले

दुबई येथे IPL साठी गेलेला क्रिकेटपटू सुरेश रैना हा तडकाफडकी हिंदुस्थानात परतला होता. तो अचानक परत येण्यामागचं कारण अनेकांना कळालं नव्हतं. त्याच्या परत येण्यावरून बरेच तर्क वितर्क लढवले जात होते. सुरेश रैना याने हिंदुस्थानात परतण्याबाबतचे कारण सांगितले होते. त्याच्या काकाच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला होता ज्यात काकांचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन चुलत भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रैनाची काकू ही रुग्णालयात असून तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. रैनाचे काका आणि त्यांचं कुटुंब हे पंजाबमध्ये राहात होतं. संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारी ही घटना असल्याने आपण मायदेशी परतल्याचे रैना याने सांगितले होते.
 
पंजाब पोलिसांनी या घटनेनंतर विशेष तपास पथक नेमून तपासाला सुरुवात केली होती. पोलीस हानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली हे तपास (Killer found)पथक तयार करण्यात आलं होतं.पोलिसांनी तपासादरम्यान 100 संशयितांची चौकशी केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (C M Capt. Amarinder Singh) यांनी बुधवारी या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असल्याचे जाहीर केले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील 3 आरोपींना अटक केली असून 11 आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून तो विविध राज्यात घरफोडी करत असल्याचं पोलिसांना कळालं आहे.
 
मंगळवारी म्हणजेच 15 सप्टेंबरला पोलिसांना या हत्याकांडातील 3 आरोपी हे एका रस्त्यावर दिसल्याचे कळाले होते. हे आरोपी पठाणकोट रेल्वे स्थानकाजवळील झोपड्यांमध्ये राहात असल्याचेही पोलिसांना कळाले होते. या माहितीनंतर पोलिसांनी छापेमारी करत या तीनही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून AK अशी अक्षेरे असलेली अंगठी, सोन साखळी, 1530 रुपयांची रोकड आणि दोन दांडके हस्तगत केले. हे दांडके हल्ल्यात वापरले असावेत असा पोलिसांना संशय आहे. सावन उर्फ मॅचिंग, मुहोब्बत आणि शाहरूख खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही मूळचे राजस्थानातील छिरावा आणि (Killer found)पिलानीचे रहिवासी आहेत.