रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (08:48 IST)

टीम इंडियाचा कर्णधार कोण होऊ शकतो? पाकच्या माजी गोलंदाजाने नाव सांगितले

टीम इंडियाने T20 विश्वचषक 2022 ची शानदार सुरुवात केली. भारताने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली, तर हार्दिक पांड्याने चेंडू आणि फलंदाजीत दमदार योगदान दिले. या प्रदर्शनानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचे कौतुक होत आहेत तर पाकिस्तानचे माजी महान गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हटले आहे.
 
माजी कर्णधार मिसबाह-उल-हक देखील एस्पोर्ट्सवरील या चर्चेचा भाग असताना म्हणाला की हार्दिक पांड्या स्वतःवर विश्वास ठेवतो आणि खेळाचा चांगला अभ्यास करतो.
 
मिस्बाह म्हणाला की तुम्ही हार्दिक पांड्याकडे बघितले तर कळेल की ज्या पद्धतीने त्याने संघाचे नेतृत्व केले ते विलक्षण होते. त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकली. यावरून त्याने दडपण कसे हाताळले हे दिसून येते. खासकरून त्याची भूमिका एक फिनिशर आहे आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असल्यावरच फिनिशर होऊ शकता. 
 
तर वकार युनूसने मिसबाहला रोखत म्हटले की तो पुढील भारतीय कर्णधार असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही.