जाकार्ता बुडण्याच्या दिशेने
सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे. हे शहर सर्वाधिक वेगाने बुडत आहे. काही ठिकाणी तर ते वर्षाला नऊ इंचांनी पाण्याखाली जात आहे. पुढील काही दशकांमध्ये या शहराचे अनेक भाग पूर्णपणे बुडण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या आपत्तीतून बचाव करण्यासाठी समुद्रकिनारी भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र हा उपायही पुरेसा ठरणार नाही. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे या शहरावर अशी वेळ आलेली नाही, तर त्यामागे अन्य कारणेही आहेत. त्यापैकी एक म्हणजे जमिनीचा स्तर खालावत जाणे. या समस्येचे खरे मूळ शहरात पाइपलाइनमधून पाण्याचा कमी पुरवठा होण्यामध्ये आहे. तिथे सुमारे एक कोटी लोक खासगी विहिरींतून पाण्याचा उपसा करत असून त्यावर जमीन टेकलेली आहे. अर्थात या जमिनीला सामान्ययपणे पाण्याने भरले जाऊ शकते. मात्र जाकार्तामध्ये 97टक्के शहर कॉँक्रिटच्या जमिनीने आच्छादलेले आहे. अशा स्थितीत पावसाचे पाणी जमिनीमधए मुरत नाही. ते समुद्राला वाहून जाते. त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. दुसरीकडे जमिनीवर जमिनीवरील सीमेंट कॉँक्रिटच्यावजनामुळे जमीन खचत आहे. 2007 मध्ये आलेल्या भयंकर पुरानंतर ही समस्या लोकांच्या लक्षात आली होती. मात्र तरीही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शहराला या स्थितीतून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. त्यात 40 अब्ज डॉलर खर्चून समुद्रकिनारी बांधल्या जाणार्या भिंतीचाही समावेश आहे.