प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे!
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे । प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे । ।1।।जय देव जय देव गजनरवेषा ।आरती ओवाळू तुजला विश्वेशा ।।धृ।। विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा । हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा । अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।ताण्डनृत्य करिसी तातक् धिम ताथा ।।जय।।2।। विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी । निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।गोसावीनंदन गातो कवितांशी ।।जय।।3 ।