रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (18:05 IST)

Back Pain : पाठ दुखीची कारणे , लक्षणे आणि प्रतिबंधक उपचार जाणून घ्या

पाठीच्या वेदना खालच्या भागातील नितंब आणि पायांपर्यंत सर्व भागामध्ये असते.
वेदना सहसा उपचारांशिवाय बऱ्या होऊ शकतात, परंतु जर खालीलपैकी कोणतेही लक्षणे असतील तर आपण डॉक्टर किंवा फिजियोथेरेपिस्टला दाखवणे गरजेचे आहे.
 
ताजी दुखापत, पाठीवर आघात झाले असल्यास 
पाय दुखणे
सतत पाठीत वेदना, जिथे विश्रांती किंवा झोपून सुद्धा आराम मिळत नसणे .
पाठीत वेदना किंवा सूज येणे 
विविध भागात वेदना जसे की पाय ,जननेंद्रिया,  गुदा,  नितंब
मूत्र किंवा मल वाहून जाण्यास अडचण येणे
 
पाठ दुखीची कारणे
पाठीत दुखणे दुखापत, काम करताना किंवा काही वैद्यकीय परिस्थितींमुळे होऊ शकते. हे कोणत्याही वयाच्या लोकांना प्रभावित करू शकते. जसजसे वय वाढत जाते तसतसे पूर्वीच्या पेशी आणि डीजेनेरेटिव्ह डिस्क रोगांसारख्या कारणामुळे, वेदना वाढण्याची शक्यता असते .
 
पाठीच्या खालच्या भागाची वेदना डिस्क, रीढ़ आणि तंत्रिका, पाठीच्या खालच्या भागातील स्नायू, ओटीपोट आणि पेल्विक अंतर्गत अवयवांशी संबंधित असू शकते. वरच्या भागातील पाठीची वेदना जसे की  हाडांचा विकार, छातीत दुखणे आणि मणक्याला सूज येणे.
 
कारण जाणून घ्या -
मानसिक ताण होणे
दुखापतहोणे, फ्रॅक्चर किंवा पडणे
स्लिप डिस्क्स खराब होणे
स्नायू आकुंचन पावतात
स्नायू ताणल्याने
अचानक, विचित्र हालचाली करणे  
खूप जड वजन उचलणे
चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे
 
ऑस्टियोपोरोसिस
संधिवाताचा त्रास असल्यास 
सायटिका असल्यास 
मणक्यात गॅप येणे
मूत्रपिंड समस्या
 
पाठ दुखणे काही दररोजच्या क्रियाकल्पांमुळे किंवा खराब स्थितीमुळे होऊ शकते
दीर्घ कालावधीसाठी एकाच मुद्रेत बसून राहणे
काहीतरी जोराने आणणे, खेचणे, उचलणे
मानेला मागे- पुढे ढकलणे, जसे की वाहन चालवणे किंवा संगणक वापरणे
ब्रेक न घेता लांब पल्ल्याची सतत ड्रायव्हिंग करणे 
अनावश्यकपणे किंवा दीर्घ काळासाठी वाकून राहणे
शरीराला अति ताणने
खोकणे किंवा शिंकणे
 
पाठ दुखीसाठी प्रतिबंधात्मक उपाय-
व्यायाम-
दररोज व्यायाम केल्याने पाठीचा कणा  ताठ राहतो आणि पाठ दुखीचा त्रास होत नाही. 
व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या तज्ञाचा सल्ला घ्या. 
 
कोअर स्ट्रेंथनिंग- पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते.
 
फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंगचा मुख्य उद्देश म्हणजे स्पाइन, हिप्स आणि वरच्या पायातील भाग सुधारणे.
 
आहार-
 कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा समावेष करणे आवश्यक आहे
हे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे.
योग्य आहार योजना शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
 
 वजन-
 आपल्या पोटाभोवती वाढलेले वजन पाठीवर ताण आणू शकते.
 अधिक काळ एकाच स्थिती मध्ये बसल्यामुळे मणक्याला जोर पडून त्रास होऊ शकतो.
 ज्यामुळे सायटॅटिका होतो आणि  संधिवात होण्याची दाट शक्यता असते .
 
धूम्रपान करण्याची सवय -
निकोटीन शरीरात रक्त प्रवाह करणे प्रतिबंधित करते, त्यामुळे पाठीत दुखू शकते. 
मोठ्या प्रमाणात धूम्रपान केल्याने होणाऱ्या खोकल्यामुळे पाठ दुखीचा त्रास होऊ शकतो.
 
उभे राहण्याची स्थिती- 
चुकीच्या पद्धतीत उभे राहिल्यामुळे पाठ दुखीचा त्रास होऊ शकतो.  
 
उचलताना-
 वस्तू उचलताना, अधिक जोर लावल्यामुळे देखील पाठीच्या स्नायूंना ताण येऊन पाठदुखीची समस्या उद्भवते.
 
ड्रायव्हिंग- 
सतत ड्रायव्हिंग केल्यामुळे देखील पाठ दुखण्याचा त्रास होऊ शकतो. 
 
बेडची निवड - 
झोपताना बेडची निवड अशी असावी जे तुमच्या मणक्याला सरळ ठेवेल 
 उशीचा उपयोग करा, परंतु तुमच्या मानेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
 
शूज-
 फ्लॅट शूज वापरल्याने पाठीवर कमी ताण येतो. आणि पाठ दुखीचा त्रास कमी होतो. 

Edited By - Priya Dixit