शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (22:28 IST)

गरोदर बायकांना कॅल्शियम चा पुरवठा या पदार्थांपासून होऊ शकतो

जेव्हा एखादी बाई गरोदर होते तेव्हा तिच्यासह तिची जबाबदारी बाळाला घेऊन देखील वाढते. काय खावं आणि काय नाही. या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गर्भधारणे दरम्यान सर्व व्हिटॅमिन्स बाईला हवे असतात. तसेच मुलांना कोणत्याही विकारांपासून दूर ठेवण्यासाठी ह्याची गरज आहे. एकंदरीत गरोदरपणात बाईला कॅल्शियमचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते. चला तर मग जाणून घेऊ या की गरोदरपणात कोणत्या गोष्टींचा सेवन करून आपल्या येणाऱ्या बाळाची काळजी घेऊ शकता. 
 
* दूध आणि दही-
गरोदर महिलांना दूध किंवा दह्याने बनलेल्या वस्तूंचे सेवन करावं. दूध आणि दह्यात 125 मिलिग्रॅम पर्यंत कॅल्शियम आढळत. कमी चरबीयुक्त दही मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळत.या शिवाय स्त्रिया मसूरच्या डाळीचे सेवन देखील करू शकतात. कारण मसूरच्या डाळीत 19 मिलिग्रॅम पर्यंत कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते. मसूरच्या डाळीचे वरण करू शकता. जेणे करून त्यांना ह्याचा फायदा मिळू शकेल. 
 
* ब्रोकोली -
जरी आपण ब्रोकोली कमी खात असाल किंवा आवडत नसेल, तरी ही गरोदर स्त्रियांनी  ह्याचे सेवन करावे. या मध्ये आयरन, फॉलिक एसिड,फायबर,अँटी ऑक्सिडंट सह अनेक पोषक घटक आढळतात, जे गरोदर स्त्रियांसाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, 156 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये 63 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. या शिवाय गरोदर स्त्रिया सोयाबीन किंवा सोयामिल्कचे सेवन देखील करू शकतात. कारण या मध्ये देखील कॅल्शियमचे प्रमाण चांगले असतात.
 
* खजूर - 
खजूर देखील गरोदर स्त्रियांसाठी एक चांगला पर्याय असू शकत. खजुराच्या सेवन केल्यानं ह्याचा थेट फायदा बाळाला मिळतो. या मुळे बाळाचे हाड आणि दात दोन्ही बळकट होण्यात मदत मिळते. तसेच हिरव्या पालेभाज्या जसे की पालक मध्ये 250 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. त्याचा सेवन केल्यानं स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅल्शियम च्या कमतरतेला पूर्ण होण्यास मदत मिळते. पालक मध्ये आयरन देखील मुबलक प्रमाणात आढळत. म्हणून गरोदर स्त्रियांना ह्याचा सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
 
* संत्री-
संत्रीचे सेवन केल्यानं गरोदर स्त्रियांना व्हिटॅमिन सी मिळत. संत्री मध्ये व्हिटॅमिन सी च्या व्यतिरिक्त कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात आढळत. ह्याचा सेवनाने प्रतिकारक शक्ती चांगली राहते. ह्या मध्ये कॅल्शियम 50 मिलिग्रॅम पर्यंत असते. या शिवाय गरोदर स्त्रीने बदाम खावं. बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होत. या शिवाय या मध्ये कॅल्शियम देखील चांगल्या प्रमाणात आढळते. 100 ग्रॅम बदामा मध्ये सुमारे 264 मिलिग्रॅम कॅल्शियम आढळते.