मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (15:05 IST)

या लोकांनी काजू मुळीच खाऊ नये

तसं तर आहारात सुके मेवे खाणे फायदेशीर मानले जाते परंतु काही ड्राय फ्रूट्स फायदा देण्याऐवजी नुकसान करु शकतात. जसे याचे सेवन केल्याने हाय बीपी, हार्ट संबंधी आजार अशा समस्या वाढू शकतात.
 
ड्राय फ्रूट्समध्ये काजू एनर्जी देणारा मेवा आहे. याचे सेवन केल्याने खूप फायदे देखील होतात. यात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, आयरन भरपूर प्रमाणात आढळतं. हे सर्व पोषक घटक शरीराला हेल्दी ठेवण्यास मदत करतात.
 
काजूमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते, दिवसातून 4 ते 5 काजू खाल्ल्यास फायदा होतो. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो. काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडेही मजबूत होतात. एका संशोधनादरम्यान असे आढळून आले आहे की काजू खाणे अनेक रोगांमध्ये हानिकारक मानले जाते.
 
काजू हृदयाच्या रुग्णांसाठीही हानिकारक
काजू खाल्ल्याने हृदयाच्या समस्या वाढतात, हे एक अस्वास्थ्यकर अन्न आहे कारण त्यात जास्त प्रमाणात चरबी असते ज्याला ट्रायग्लिसराइड म्हणतात. 100 ग्रॅम काजू खाल्ल्याने चरबी 47 टक्के वाढते, तर 100 ग्रॅम काजूमध्ये 12 चमचे तेल असते. त्यामुळे हृदयरोग्यांनी काजू खाऊ नयेत.
 
लठ्ठपणा टाळण्यासाठी काजू खाऊ नका
ज्याचे वजन जास्त आहे त्यांनी देखील काजू खाऊ नये कारण काजूमध्ये 18 ग्रॅम प्रथिने आणि 553 कॅलरीज असतात, जे खूप जास्त असते. जे लोक लठ्ठ आहेत त्यांनी काजू खाऊ नयेत.
 
काजूमुळे शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाण वाढते
काजू शरीरातील टॉक्सिनचे प्रमाण वाढवण्याचे काम करते. कारण त्यात उरुशिओल असते. अशी समस्या असल्यास काजूचे सेवन कमीत कमी करा.