रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (08:00 IST)

Covid-19:वास घेण्याची शक्ती का जाते,जाणून घेऊ या

कोविड मुळे बाधित झालेले रुग्ण बरे होत आहे परंतु त्यांच्यामध्ये एक नवीन समस्या उद्भवत आहे.आणि ती आहे वास घेण्याची शक्ती कमी होणे.जरी हे डॉ द्वारे स्पष्ट केले गेले आहे की काही दिवसांनी वास घेण्याची क्षमता परत येईल.परंतु बर्‍याच लोकांना 6 महिन्यांनंतरही कोणत्याही प्रकारचा सुगंध जाणवत नाही. ही चिंताजनक बाब आहे. परंतु काही उपाय आहेत ज्याच्या मदतीने वास घेण्याची शक्ती पुन्हा परत येऊ शकते. परंतु त्या आधी,वास घेण्याची शक्ती का जाते जाणून घेऊ या.
 
 
मानवी नाकात उपस्थित ओल्फक्टरी नर्व्ह शी जुडलेले असते.हेच ते साधन आहे. ज्याद्वारे कोणत्याही प्रकाराची वासाशी निगडित माहिती मेंदूत प्रथम प्रसारित केली जाते.परंतु कोरोना बाधित झाल्यामुळे ओलफक्टरी नर्व्ह आणि मेंदूचे संबंध तुटतात आणि वास घेण्याची शक्ती नाहीशी होते.
 
चला वास घेण्याची क्षमता परत मिळविण्यासाठी हे काही घरगुती उपाय जाणून घेऊ या. 
 
 
1 वासाची क्षमता परत मिळविण्यासाठी आंबट फळांचा वास घेतल्यामुळे आणि सेवन केल्याने देखील वास परत येऊ शकतो.शास्त्रज्ञांच्या मते, नियमितपणे हे केल्याने हे शक्य आहे.
 

2 व्हिटॅमिन-ए आणि अल्फा लिपोइक ऍसिड असलेले पदार्थ घ्या.जसे तांदूळ,
ब्रोकोली,मासे,दूध,गाजर,पालक,टोमॅटो,बीट,पपई,दही याच्या सेवनाने चव आणि वास दोन्ही परत मिळतात.
 

3 अशा काही गोष्टी असतात ज्यांची वास खूप तीक्ष्ण असते.जसे की पुदीना, लवंग, निलगिरी,जायफळ,परफ्यूम, लिंबाच्या सालाचा वास देखील घेतल्याने ओल्फक्टरी नर्व्ह पुन्हा सक्रिय केली जाऊ शकते.
 

4 योग हा आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतो. गंधची शक्ती परत आणण्यासाठी, दररोज 15 मिनिटे अनुलोम-विलोम करा. याचा फायदा काही दिवसात दिसून येईल.
 
 
5 जलनेतीच्या मदतीने देखील लॉस ऑफ स्मेल म्हणजे वास एकाएकी जाते.या वासेला आपण जलनेती च्या मदतीने पुन्हा मिळवू शकता.परंतु याचा वापर केवळ तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करा.