बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 22 मे 2023 (14:13 IST)

Health Tips : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी टॉमॅटो खा

tamatar
लाल-लाल टॉमॅटो सर्वाना खायला  आवडतात. आंबट-गोड अशी यांची चव असते  त्यात अनेक गुणधर्म असतात. टोमॅटो मुळे रक्त वाढते. जे लोक आपल्या आहारात टॉमॅटाचे जास्त सेवन करतात अशा व्यक्तींमध्ये हृदयविकार होण्याची शक्तता कमी असते.
 
एका अध्ययन मध्ये असे आढळून आले आहे की, प्रौढावस्थामधील असून, अनेक लोकांना हृदयविकारचा झटका आला होता. टॉमॅटोमध्ये आढळून येणारा लायकोपीन पदार्थचे आकलन केले आहे. लायकोपीन हे प्रभावशाली ऑक्सिकरण रुपात असल्यामुळे फ्री रेडिकल्स अत्याधिक प्रतिक्रियात्मक रेणू, जे रक्त प्रवाहमधील अन्य पदार्थानादेखील हानी पोहोचवू शकतात. उदाहरणार्थ प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे अनेक आजार होऊ शकतात. तसेच हृदयविकार आणि कॉलेस्ट्रालपासून वाचण्यासाठी जास्त टॉमॅटो खा! आणि स्वस्थ राहा
 
टोमॅटोचे सेवन करण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या
 
पोटातील जंत दूर करा- जर कोणाच्या पोटात जंतांची समस्या असेल तर टोमॅटो कापून त्यात काळी मिरी मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. रोज असे केल्याने काही दिवसात विषारी कीटकांपासून सुटका होते.
 
हृदयासाठी फायदेशीर- हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये टोमॅटो खाणे फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो
 
दृष्टी वाढवण्यासाठी फायदेशीर - दृष्टी वाढवण्यासाठी टोमॅटोचेही सेवन रिकाम्या पोटी करावे. टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे, त्यामुळे तुम्ही याचे दररोज रिकाम्या पोटी सेवन करू शकता.



Edited by - Priya Dixit