रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 21 फेब्रुवारी 2021 (09:15 IST)

आरोग्य टिप्स : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा

निरोगी राहण्यासाठी प्रत्येक जण काही न  काही करत असतो  आजार पासून वाचण्यासाठी काही टिप्स अवलंबवा आणि ह्याला आपल्या दैनंदिनी मध्ये समाविष्ट करा. चला तर मग जाणून घेऊ या.
 
* दररोज सूर्य नमस्कार करा- 
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी  दररोज सूर्य नमस्कार करावे. असं म्हणतात की सूर्य नमस्कार ही योगासनाची पूर्णता आहे. आपण जास्त करू शकत नाही तर किमान दोन वेळा सूर्यनमस्कार करा.या मुळे शारीरिक स्वास्थ्य तर चांगले राहते पण मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते. पचन तंत्र चांगले राहते शरीर लवचीक होतो. 
 
* ध्यान आणि प्राणायाम करा-
कोणत्या ही वयात निरोगी राहण्यासाठी प्राणायाम आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक आजारांना दूर करण्यासाठी किमान 15 मिनिटे ध्यान आणि प्राणायाम करावे. 
 
* दररोज आंघोळ करावी -
बऱ्याच लोकांची सवय असते की ते आंघोळ करत नाही किंवा उशिरा करतात असं करू नये. दररोज आंघोळ करावी जेणे करून शरीरात रक्त विसरणं चांगलं होत . जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नये.
 
* योग्य आहार घ्या. -
आपल्या आहार कडे लक्ष्य द्या पौष्टिक आहार घ्यावा. शिळे अन्न खाऊ नका. तसेच जंक फूड घेणे टाळा.
 
* पाणी भरपूर प्या- 
  शरीर पाण्यावर निर्भर आहे. बरेच लोक कमी पाणी पितात असं करू नये पाणी भरपूर प्यावं. या मुळे शरीर निरोगी राहत.