वजन कमी करण्यासाठी दिवसाला किती पोळ्या खाव्या
आपल्या दररोजच्या कॅलरीच्या प्रमाणाला लक्षात घेता पोळी किंवा भाकरीचे सेवन करावं. यामुळे आपल्या वाढत्या वजनाला कमी करण्यात मदत मिळेल.
वजन कमी करण्यासाठी लोकं आपल्या आहाराची काळजी घेतात. वास्तविक शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट घेणं टाळावं लागतं. कार्बोहायड्रेटमुळे वजन झपाट्यानं वाढतं. पण कार्बोहायड्रेट हे आवश्यक मायक्रोन्यूट्रिएंट आहे ज्याला वगळून चालणार नाही.
आपण भारतातील आहाराबद्दल बोलू या, तर पोळी आणि भात हे कार्बोहायड्रेटचे चांगले स्रोत आहेत. जवळ-जवळ प्रत्येक घरात भात आणि पोळ्या नियमित पणे लोकं खातात. परंतु जेव्हा गोष्ट येते वजन कमी करण्याची, तर लोकांना हे जाणून घ्यायचे असतं की दर रोज किती पोळ्या खावं. जेणे करून वजन वाढणार नाही.
चला तर मग जाणून घ्या-
गव्हामध्ये पौष्टिक घटक आढळतात : पोळ्यांमध्ये फक्त कार्बोहायड्रेटचं नव्हे तर इतर आवश्यक पोषक घटक देखील आढळतात. गहू हे प्रथिनं, फॅट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फॉलेट आणि लोहाचं सर्वात चांगलं स्रोत असतं. पोळी किंवा चपाती खाल्ल्यानं शरीरास सर्व पोषक घटक मिळतात.
दिवसात किती पोळ्या किंवा भाकऱ्या खाव्या : कार्बोहायड्रेट, प्रथिनं आणि फॅट किंवा चरबीला मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतात. शरीरातील विविध कार्ये करण्यासाठी आपल्या शरीरास यांची गरज पडते. सर्वप्रथम आपल्या हे ठरवावे लागणार की आपल्याला दररोज किती प्रमाणात कार्बोहायड्रेट घ्यावयाचे आहे. त्यानुसारच आपण दिवसाचा पोळीचा किंवा भाकरीचा आहार ठरवावा. 6 इंचाच्या लहान पोळी मध्ये देखील 71 कॅलरी आढळते. आपण दुपारच्या जेवणात 300 कॅलरी घेता, तर आपण 2 पोळ्या खाऊ शकता. या पासून आपल्याला 140 कॅलरीच मिळते आणि बाकीची कॅलरी आपल्याला सॅलड आणि भाज्यांपासून मिळते. लक्षात ठेवा की पोळीच्या शिवाय आपण ज्या भाज्या आणि फळ घेत आहात त्यांचा मध्ये देखील कार्बोहायड्रेट आढळतं. म्हणून आपल्या कॅलरीच्या सेवन करण्यावरच हे अवलंबून आहे की आपल्याला दिवसात किती पोळ्या खायला हव्या. दिवसातून चार पोळ्या खाणं वजन कमी करण्यासाठी चांगले मानतात.
पोळीचे इतर पर्याय :
जर आपण वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्नात आहात, तर आपण गव्हाच्या पोळीच्या व्यतिरिक्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी देखील खाऊ शकता. या भाकरी गव्हाच्या पोळी पेक्षा सुपाच्य आणि आरोग्यवर्धक असतात आणि या मध्ये कार्बोहायड्रेट कमी तर इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.
हे लक्षात घ्या :
आहारात फक्त कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी केल्यानं वजन कमी होत नसतं.या साठी आपल्याला इतर गोष्टी जसे की आपली जीवन शैली, झोपण्याची पद्धत आणि नियमितपणे व्यायामाची दिनचर्या या गोष्टी देखील आवश्यक आहेत. निरोगी आणि संतुलित आहारासह या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं.