1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 23 मे 2023 (15:27 IST)

खसखसचे 10 मौल्यवान फायदे जाणून घ्या

1 खसखस ही ​​वेदना कमी करण्यासाठी म्हणून वापरले जाते. त्यात आढळणारे ओपियम अल्कलॉइड्स सर्व प्रकारच्या वेदना दूर करण्यात महत्वाची भूमिका निभावतात.विशेषतः,हे स्नायूंच्या वेदनांमध्ये वापरले जाते. बाजारात खसखशीचे तेल देखील उपलब्ध आहे, जे वेदना असलेल्या जागे वर वापरले जाते.
 
2 श्वसनाच्या समस्येमध्ये देखील खसखशीचा वापर करणे फायदेशीर आहे.हे खोकला कमी करून श्वसन समस्येमध्ये दीर्घकालीन आराम देण्यास देखील मदत करते.
 
3 आपण झोपेच्या समस्येमुळे त्रासलेले आहात तर झोपण्याच्या पूर्वी खसखशीचे गरम दूध पिणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे निद्रानाशची समस्या दूर करते. हे आपल्याला झोपेसाठी प्रेरित करेल.
 
4 खसखस ​​फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे, याचे सेवन केल्याने   बद्धकोष्ठता होत नाही. या व्यतिरिक्त हे पचनक्रिया चांगली होण्यास मदत करते आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
 
5 किडनीच्या स्टोन मध्ये देखील हे उपचार म्हणून वापरतात.या मध्ये आढळणारे ऑक्सिलेट शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम शोषून किडनीमध्ये स्टोन होण्यापासून प्रतिबंधित करते.
 
6 खसखस ​​मानसिक तणाव दूर करण्यात तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. जे आपल्याला आपले तारुण्य राखण्यास मदत करतात.
 
7 खसखस ​​त्वचेला ओलावा देण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे त्वचेची जळजळ आणि खाज कमी होते.तसेच एक्झिमा सारख्या समस्यांशी लढण्यात मदत होते.
 
8 ओमेगा -6 फॅटी ऍसिड्स, प्रोटीन, फायबरने खसखस ​​समृद्ध असण्यासह या मध्ये फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन बी, थायमिन, कॅल्शियम आणि मॅंगनीज देखील आढळते. जे पौष्टिकदृष्ट्या फायदेशीर असतात.
 
9 त्वचा सुंदर करण्यासाठी, खसखस ​​एक फेसपॅक म्हणून वापरला जातो हे  दुधामध्ये वाटून वापरले जाते. हे त्वचेला ओलावा प्रदान करते तसेच चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक आणतो आणि चेहरा उजाळतो.
 
10 या व्यतिरिक्त अति आवश्यक लहान लहान समस्या जस की जास्त तहान लागणे,ताप येणे,सूज येणे,पोटातील जळजळ पासून मुक्ती मिळविण्यासाठी खसखस वापरतात.हे पोटातील उष्णता शांत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.