गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 23 मे 2021 (17:03 IST)

मशरूम चे सौंदर्यवर्धक फायदे जाणून घ्या

आपण मशरूमचे बरेच फायदे ऐकले असतील, परंतु आपल्याला माहिती आहे काय? मशरूम चे सेवन केल्याने आपण निरोगी राहू शकतो आणि आपले सौंदर्य वाढवू शकतो. चला तर मशरूमचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.
 
* मशरूम त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.
 
* मशरूम ने त्वचेशी निगडित समस्यांमध्ये मुक्ती मिळते.मुरूम आणि खरूज झाले असल्यास मशरूम ते बरे करतो.
 
* मशरूममधील कोझिक ऍसिड नैसर्गिक त्वचेचा लायटर  म्हणून कार्य करतो .
 
* मशरूममध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिनडी, पोटॅशियम, तांबे, आयरन आणि सेलेनियम समृद्ध असतात. हे स्नायूंच्या क्रियाकलापांमध्ये खूप फायदेशीर आहे.
 
* मशरूम मध्ये अँटीऑक्सीडेंट मुबलक असतात, जे वाढत्या वयाची चिन्हे कमी करण्यात मदत करतात.तसेच वजन कमी करतो.
 
* मशरूम मध्ये उपस्थित घटक प्रतिकारशक्ती वाढवतात.
 
* जर आपण नियमितपणे मशरूम खाता तर समजाव  की आपल्याला आवश्यकतेचा  20%  व्हिटॅमिन डी मिळत आहे.
 
* मशरूम मध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण फारच कमी असते, ज्यामुळे आपले वजन आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. 
 
* मशरूम मध्ये कोलेस्ट्रॉल चे प्रमाण देखील जास्त नसतात , यासह, हे खाल्ल्यामुळे बर्‍याच काळ भूक लागत नाही.
 
* मशरूमचे सेवन केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.अभ्यासां मध्ये असे सांगितले गेले आहे की याचे नियमित सेवन केल्याने  कर्करोग होण्याची शक्यता देखील कमी होते.