शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (08:50 IST)

भांडणे झाली असल्यास, या प्रकारे माफी मागू शकता,नात्यात प्रेम वाढेल

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसंडत आहे. जरी संक्रमित लोकांची संख्या खाली आली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही.लॉक डाऊन मुळे सर्व आपापल्या घरात आहे. घरात जोडप्यांमुळे भांडण देखील होत आहेत.रुसवे-फुगवे झाल्यामुळे घरातील वातावरण तर बिघडत आहे.तर आपसात देखील नातं दुरावत आहे.असं होऊ नये त्यासाठी एकमेकांची क्षमा मागून आपण दुरावल्या नात्याला पुन्हा जवळ करू शकता. या साठी काही टिप्स सांगत आहोत.चला जाणून घेऊ या.
 
 1 घरकामात मदत करून-आपले जोडीदाराशी भांडणे झाले असल्यास आपण त्यांचा राग घालविण्यासाठी त्यांची घरकामात मदत करून त्यांचा राग शांत करू शकता.स्वयंपाकात मदत,घराची सफाई करण्यात मदत करून आपण माफी मागून त्यांचा राग शांत करून नात्यात पुन्हा गोडवा आणू शकता.
 
2 कॅण्डल लाईट डिनरची व्यवस्था करून-सध्या लॉक डाऊन असल्याने बाहेर जाऊ शकत नाही.आपल्याला आपल्या जोडीदाराचे राग शांत करायचे असल्यास आपण त्यांच्यासाठी घरातच कॅण्डललाईट डिनरची व्यवस्था करू शकता.या साठी आपण जोडीदाराच्या आवडीचे जेवण देखील बनवू शकता.किंवा बाहेरून मागवू शकता.कॅण्डल लाईट डिनरच्या दरम्यान आपण त्यांची माफी मागू शकता.
 
3 त्यांच्या आवडीची भेट देऊन- असं म्हणतात की एखाद्याला मनावयाचे असेल तर भेटवस्तू कामी येतात.आपण त्यांच्या साठी ऑनलाईन काही भेटवस्तू मागवून देखील त्यांचा राग शांत करू शकता. या भेटवस्तूसह आपण त्यांना सॉरीची चिट्ठी लावून देखील देऊ शकता.असं केल्याने आपले नाते बहरून निघेल.
 
4 त्यांची स्तुती करून- स्तुती ऐकणे कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला असं वाटते की त्याच्या जोडीदाराने त्याची स्तुती केली पाहिजे.आपल्याला देखील आपल्या जोडीदाराला मनवायचे असल्यास त्यांची स्तुती करा,त्यांना हे लक्षात आणून द्या की आपण केलेल्या कृतीसाठी दिलगीर आहात.आपण त्यांची माफी मागितल्यावर ते सहज आपल्याला माफ करतील.आणि आपल्या नात्यात प्रेमाचा वर्षांव होऊन आपले नाते पुन्हा बहरून निघेल.