Nonveg recipe : दिलखुश कबाब
साहित्य : खिमा पाव किलो, दोन बटाटे उकडून, भिजवून जाडसर वाटलेली चनाडाळ, एक अंडे, दोन-तीन स्लाईस ब्रेड, हळद, दोन चिरलेले कांदे, आले एक इंच, लसूण आठ दहा पाकळ्या, एक टी स्पून गरम मसाला पावडर, पाव वाटी कोथिंबीर, लिंबूरस, पुदिना, तेल, मीठ, रवा पाव वाटी.
कृती : सर्वप्रथम बटाटे उकडून स्मॅश करून घ्यावे. खिमा वाटून घ्यावा. आले-लसूण पेस्ट, पुदिना पेस्ट, हळद व मीठ लावून खिमा आवश्यक तेवढ्याच पाण्यात शिजवून घ्यावा. वाटलेली चनाडाळ, ब्रेडचे स्लाईस, चिरलेले कांदे, बटाटे, अंडे, कोथिंबीर, लिंबूरस, तिखट व मीठ चवीनुसार घालावे व गोल कबाब करून त्यात घोळवून गरम तेलात तळून घ्यावे.
सर्व्ह करताना किंचित तूप शिंपडून गॅसवर तंदूर करावे व टोमॅटो सॉसबरोबर खावयास द्यावे.